
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त ‘टीव्ही-9’ या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने चालवले. तसेच या सहा आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे वृत्तही देण्यात आले. हे सर्व आमदार विधानसभा निवडणुकीआधी मेगाभरतीदरम्यान राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सहभागी झाले होते.
दिलेला शब्द 100 टक्के पाळणे हीच ठाकरे परिवाराची ओळख- अरविंद सावंत
24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, परंतु आता 20 दिवस होत आले तरी नवीन सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते, मात्र भाजपने संख्याबळ नसल्याने हा प्रस्ताव नाकारला. यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. सोमवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत शिवसेनेला संख्याबळ दाखवावे लागणार आहे.
https://www.saamana.com/maharashtra-political-crisis-live-update-shiv-sena-bjp-ncp-congress/
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व अशी स्थिती महाराष्ट्र अनुभवत आहे. या राजकारणाची गल्ली ते दिल्ली अशी चर्चा रंगली आहे. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी शिवसेनेला अवघ्या 24 तासांची मूदत दिली आहे. मात्र असे असले तरी शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची जयपूरमध्ये तर राष्ट्रवादीची मुंबईत भाजपची वर्षा बंगल्यावर अशा महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत.



























































