
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमा शुल्क विभागाने 6 ते 9 नोव्हेंबरदरम्यान धडक कारवाई करून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सहा प्रवाशांना रंगेहाथ पकडले. त्या तस्करांकडून 14 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय एका प्रवाशाकडून 358 ग्रॅम वितळवलेले सोन्याचे बारही जप्त करण्यात आले आहेत. 8 नोव्हेंबर रोजी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कारवाया केल्या.




























































