स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, विवाहसोहळा पुढे ढकलला

टीम इंडियाची स्टार महिला स्मृती मानधना हिचे आज प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छाल याच्यासोबत लग्न होणार होते. सांगली येथे रविवारी हा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे स्मृती व पलाशचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.