पांड्या नंतर रोहितची विकेट, एक्सने केले काही धक्कादायक खुलासे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हार्दिक पांड्याला महिलांवरील वक्तव्ये करणे महागात पडलेले असतानाच आता क्रिकेटपटू रोहित शर्मा देखील अडचणीत आाला आहे. रोहितची एक्स गर्लफ्रेंड सोफिया हयातने त्यांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. रोहितने तिच्यासोबतचे नाते मान्य केलेले नसले तरी सोफियाने ती व रोहित काही दिवस तिच्या घरी एकत्र राहत होते असा दावा केला आहे. सोफिया सध्या तिच्या जीवनावर एक पुस्तक लिहित असून त्यात ती रोहित सोबतच्या नात्याविषयी देखील लिहणार आहे.

स्पॉटबॉयला सोफियाने दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ती व रोहित कुठे भेटले, कसे त्यांचे नाते फुलत गेले व त्याने तिला कशाप्रकारे नाकारलं हे सर्व तिने या मुलाखतीत तिने सांगितले आहे. ‘माझ्या एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानिमित्त मी लंडनमध्ये एका क्लबमध्ये पार्टी करत होते. मी नाचत असतानाच माझ्या एका मित्राने माझी रोहितशी ओळख करून दिली. मी फार क्रिकेट बघायचे नाही त्यामुळे मी रोहितला ओळखले नाही. पण नंतर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. काही वेळाने आम्ही क्लबमधल्या शांतता असलेल्या ठिकाणी गेलो. तिथेच एकमेकांच्या जवळ आलो. त्याने माझे चुंबन घेतले. त्यानंतर आम्ही पुन्हा क्लबमध्ये गेलो. एकत्र नाचत होतो. सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. चार दिवसांनी तो माझ्या घरी माझ्य़ासोबत राहायला आला. पण जेव्हा आमच्या अफेयरच्या चर्चा होऊ लागल्या त्यावेळी त्याने एका मुलाखतीत माझा उल्लेख त्याची चाहती असा केला. त्याचा मला धक्काच बसला. त्यानंतर मी त्याच्यासोबतचे नाते तोडून टाकले. त्याला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं. मला भविष्यात त्याचे तोंडही बघायचे नाही’, असे सोफियाने सांगितले.

2017ला सोफियाने रोमानिआचा इंटिरिअर डिझायनर व्लाड स्टॅनस्कूसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर ती गर्भवतीही राहिली होती. मात्र काही कारणाने तिचे व व्लाडचे लग्न टिकू शकले नाही व त्यातच तिचा गर्भपातही झाला होता. तिने तिच्या नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रारही केली होती.