महामार्गापासून स्वामी मठापर्यंतचा रस्ता विकसित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट ‘तीर्थ क्षेत्र ते तीर्थ क्षेत्र’ जोडणारे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय अंतर्गत देशभरात रस्त्याचे जाळे विणले जात आहे. यामध्ये सोलापूर जिल्हादेखील मागे राहिलेला नाही. जिह्यामध्ये अक्कलकोट तालुका हा राष्ट्रीय महामार्गाचा ‘हब’ होणार असे चर्चिले जात आहे. मात्र, महामार्ग होत असताना तीर्थस्थळांच्या मंदिरापर्यंत रस्ते विकसित होणे अपेक्षित आहे. अक्कलकोटच्या बाबतीत असे न झाल्याने याचा फटका स्वामिभक्तांना बसला होता. त्यामुळे आता शहरानजीकच्या महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपापासून ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अन्नछत्र मंडळ व बुधवार पेठेतील समाधी मठापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वामिभक्तांसह शहरवासीयांतून आनंद व्यक्त होत आहे.

अक्कलकोट ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग झाला खरा; मात्र परगावाहून येणाऱया भक्तांना स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पोहचण्याकरिता रस्ताच नसल्याने थेट त्यांना दुधनी, गुलबर्गा, वागदरीपर्यंत पोहचावे लागल्याची उदाहरणे आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये प्रवेश करण्याकरिता रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावरून उजवीकडे प्रवेश करावा लागतो. मगच अक्कलकोट शहर व वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र मंडळ, समाधीमठ अन्य देवस्थानस्थळी पोहचावे लागते. उड्डाणपुलावरून जाणाऱया रस्त्यामुळे स्वामिभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वामिभक्तांची सोय व वाहतुकीची कोंडी न होता सुरळीत होण्याकरिता रिलायन्स पंप ते मंदिरापर्यंतचा रस्तादेखील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय विकसित करणार आहे. लवकरच याबाबतच कारवाई होणार आहे.

नुकतेच नगरपरिषदेने 368 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे भाविक ही तरंगती लोकसंख्या व स्थानिक लोकसंख्या पुढील 25 वर्षांच्या अनुषंगाने विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सध्या पालखीमार्ग विकास, श्री वटवृक्ष मंदिर व समाधी मठ परिसर विकास या करिता होणारे भूसंपादन याबाबत सध्या शहरवासीयांतून मोठय़ा प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे. याबरोबरच दररोज पिण्याचे पाणी एकाच वेळी सर्व झोन मिळाले पाहिजेत, या अपेक्षाही पुढे येत आहेत. यासह नगरपरिषदेच्या जुन्या दवाखान्यात पाचमजली व्यापारी संकुल व आतील बाजूस नगरपरिषदेचे प्रशासन भवन होणार असल्याची चर्चा आहे.

आणखी 6 रस्ते होणार

राज्यासह परराज्यांतील व परदेशातून येणाऱया स्वामिभक्तांची वाढत असलेली गर्दी पाहाता प्रशासनदेखील सर्तक राहून कार्यरत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडून श्री क्षेत्र अक्कलकोटहून आणखीन सहा रस्ते प्रस्तावित आहेत. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग सोडून सदरचे हे 6 हस्ते होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबरोबरच श्री स्वामी समर्थ औद्योगिक वसाहत एमआयडीसी येथील उड्डाणपुलाला जोडणारा बायपास होण्यासाठीही महामार्ग मंत्रालयाकडून आखणी केली जात आहे.