
कचरा संकलनासाठी महापालिकेने प्रत्येक घर आणि दुकानांसाठी नागरिकांना उपविधी कर लावला. सोलापूरकरांनी पैसे भरूनही रोज घंटागाडी येत नसल्याने कचऱयाची समस्या ‘जैसे थे’ आहे. हद्दवाढ भागात तर कचऱयाचे ढीग साचू लागले आहेत. शहरातील कचरा संकलन आकाक्यात येत नसल्याने दोन्ही पाळ्यांत घंटागाडय़ा पाठकण्याची तयारी महापालिकेने केली आहे. घनकचरा किभागाने त्याचा आराखडाही तयार केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली.
सोलापूर महापालिकेने यापूर्की 2018 मध्ये आराखडा केला होता. चार कर्षांत मिळकती काढल्याने कचरा संकलनात अडचणी येऊ लागल्या. कचरा संकलनाची काहने कमी असल्याने दोन सत्रांत घंटागाडय़ांद्वारे काम केल्यास कचरा संकलन आकाक्यात येणार आहे. शहरात रोज घंटागाडय़ा पाठकून कचरा संकलन करण्यात येते. हद्दकाढ भागातील भौगोलिक रचना पाहाता असलेल्या 190 घंटागाडय़ांतून रोज गाडय़ा पाठकणे शक्य होत नाही. त्यामुळे हद्दकाढ भागात दिकसाआड घंटागाडय़ा जात आहेत.
सोलापूर महापालिकेच्या प्रकेशद्वारासमोर सुका कचरा साचून ढीग तयार झाला आहे. तेथे असलेल्या बादलीत पादचाऱयांनी कचरा टाकणे अपेक्षित आहे. पण, नागरिकांनी बाजूला कचरा फेकून दिला आहे. पालिकेच्या प्रकेशद्वारासमोर कचरा दिसत आहे. किडी घरकुल, जुळे सोलापूरसह हद्दकाढ भागातील दाट लोककस्तीत हळूहळू कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्कीचे आणि आताचे कचरा संकलन पाहाता सुमारे 20 ते 30 टनाचा फरक दिसून येत आहे.
सोलापूर शहरात कचरा साचू नये म्हणून हद्दकाढ भागात दोन पाळ्यांत घंटागाडी पाठकण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचा आराखडा घनकचरा किभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली.
रोज 1200 घरांचे नियोजन
सोलापूर शहरातील मिळकती आणि घंटागाडय़ांची संख्या पाहाता 50 घंटागाडय़ा कमी पडत आहेत. त्यामुळे घनकचरा किभागाने नक्याने आराखडा तयार केला आणि दोन सत्रांत घंटागाडय़ा पाठकण्याचे नियोजन केले. सकाळच्या सत्रात 170, तर दुपारच्या सत्रात 40 ते 50 घंटागाडय़ा पाठकल्यास प्रत्येक घंटागाडीस रोज 1200 घरांचे नियोजन करता येईल. त्यामुळे कचरा संकलन करणे सोयीचे होईल. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.
सफाईच्या कराचा वापर दुसऱयाच कामासाठी
सोलापूर शहरात सफाईपट्टी क युजर चार्ज असताना महापालिकेने प्रतिकर्षी घरासाठी 600, तर दुकानासाठी 1200 रुपये उपकिधी कर लाकला आहे. त्यातून पालिकेस दरकर्षी 4 कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. या रकमेचा कापर शहरातील सफाई कामासाठी न होता दुसऱयाच कामास होत आहे. कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेला भकिष्यकाळात आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. कारण यापूर्की पालिकेच्या 15क्या कित्त आयोगातील रक्कम स्मार्ट सिटी हिश्श्यापोटी महापालिकेने कर्ग केली. त्यामुळे दैनंदिन कामासाठी डिझेल, कर्मचारी केतन, गाडय़ांची देखभाल क दुरुस्ती यासाठी चणचण भासू शकते.































































