Solapur news – डॉ. सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई डॉ. सुजय अभय फडके यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलगी व महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. शिरीश वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वळसंगकर कुटुंबातील वाद चिघळला आहे. डॉ. वळसंगकर यांचा जावई डॉ. सुजय अभय फडके यांच्याविरुद्ध डॉ. वळसंगकर यांची सून व नातीने जानेवारी ते जून या कालावधीत मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून डॉ. सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला आहे.

बसखाली चिरडून प्रवाशाचा मृत्यू

अक्कलकोट बसस्थानकात बसखाली चिरडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. इस्माईल मुल्ला असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. अलिद येथील राहणारे इस्माईल मुल्ला हे आज अक्कलकोट बस स्थानकातून बाहेर पडत असताना आऊटगेटमधून आलेल्या एसटीच्या समोरील चाकाखाली ते सापडले. यात इस्माईल शेख यांचा मृत्यू झाला.