कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोलापूर विद्यापीठ परीक्षेचा बोजवारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यापीठाचे कंत्राटी कर्मचारी आणि विनाअनुदानित महाविद्यालयांतील कर्मचारी आणि प्राध्यापक यांच्या मदतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा जारी झाल्या असल्या तरी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परीक्षेवरील बहिष्कार आंदोलनामुळे या परीक्षेचा बोजवारा उडाला आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील विद्यापीठांसह 37 अनुदानित महाविद्यालयांतील 750 शिक्षक कर्मचारी परीक्षेवरील बहिष्कार आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे 2 फेब्रुवारीपासून स्थगित केलेल्या परीक्षा सोमवारपासून (दि.6) बऱ्याच अडचणींनंतर उशिराने सुरू झाल्या. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये दुपारी 12 वाजता होणारा पेपर 1.45 वाजता सुरू झाला. दयानंद व छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयामध्ये 30 मिनिटांपर्यंत परीक्षा उशिराने सुरू झाल्या. ग्रामीण भागामध्येही 15 मिनिटांपर्यंत उशीर झाला.

विद्यापीठाच्या या परीक्षा महाविद्यालयांतील अंतर्गत परीक्षेसारख्याच झाल्या. कोणतीही गुप्तता नव्हती. बेंचवर नंबर टाकले नव्हते. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असल्यामुळे वर्गात रोल नंबर प्रमाणे बसविले होते. काही ठिकाणी बहिस्थ परीक्षकही नक्हते. बऱयाच ठिकाणी आय. टी. समन्वयक शिक्षकेत्तर कर्मचारी असल्यामुळे ऐनवेळेस आय. टी. समन्वयक बदलले. त्यामुळे यूजर आयडी पासकर्ड त्यांना द्यावे लागले. त्यामुळे पेपर डाउनलोड करण्यास उशीर झाला. विद्यापीठाने महाकिद्यालयात ऐन वेळेस नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे विद्यापीठाचे लेखी आदेश नव्हते.