पाचव्या वर्षी लैंगिक शोषण, 14 व्या वर्षी बलात्कार; आता सलमानसोबतच्या नात्याबाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याचे नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. नव्वदच्या दशकामध्ये एकामागोमाग एक हिट चित्रपट देणाऱ्या सलमानसोबत मूळची पाकिस्तानमध्ये जन्मलेली अमेरिकन अभिनेत्री सोमी अली (Pakistan-born American actor Somy Ali) हिचेही नाव जोडले गेले होते. दोघे तब्बल आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि दोघे वेगळे झाले. आता तब्बल 20 वर्षानंतर सोमी अली हिने त्या घटनेबाबत मौन सोडले असून धक्कादायक खुलासा केला आहे.

नव्वदच्या दशकामध्ये सोमी अली आणि सलमान खान यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. सलमानसोबत सोमी अली हिने ‘बुलंद’ नावाचा चित्रपटही केला. मात्र हा चित्रपट कधी चित्रपटगृहामध्ये लागलाच नाही. दोघांना ऑनस्क्रीन पाहण्याची चाहत्यांची इच्छा इच्छाच राहिली. परंतु दोघांची ऑफस्क्रीन लव्हस्टोरी चांगलीच गाजली. आठ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. यानंतर दोघे पुन्हा एकत्रही दिसले नाही. यामागील कारणांचा खुलासा आता सोमी अली हिने ‘झुम डिजीटल’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.

’20 वर्षांपूर्वीच आमच्यामध्ये ब्रेकअप झाले. त्याने मला अनेकदा धोका दिला. त्यामुळे मी त्याच्यासोबत ब्रेकअप केले आणि त्याला सोडून गेले’, असा खुलासा सोमी अली हिने केला आहे. तसेच यानंतर आम्ही दोघेही आमच्या खासगी आयुष्यामध्ये व्यग्र झालो. या घटनेनंतर सलमानसोबत मी पाच वर्ष बोललेही नव्हते, असेही सोमी अली हिने सांगितले.

तसेच मी बॉलिवूडचा भाग होण्यासाठी हिंदुस्थानमध्ये कधी गेलेच नव्हते. मला फक्त सलमानसोबत काम करायचे होते. परंतु एकदा त्याच्यासोबतच ब्रेकअप झाले म्हटल्यावर माझ्यासाठी तिथे करण्यासारखे काहीच नव्हते, असे सोमी अली हिने सांगितले. तसेच बॉलिवूडसाठी आपण योग्य नसल्याचेही ती म्हणते. त्यामुळे पुनरागमन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही तिने सांगितले.


View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

याआधी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोमी अली हिने सांगितले की, सलमान खान याला पहिल्यांदा ‘मैने प्यार किया’ या चित्रपटावेळी पाहिले होते आणि तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडली होती. त्याचवेळी मी त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या ओढीनेच मी हिंदुस्थानमध्ये आले आणि बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर अखेर मला सलमानला भेटायला संधी मिळाली, असेही ती सांगते.

14 वर्षी बलात्कार झाल्याचा केला होता आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमी अली हिने आपल्यावर 14 वर्षांची असताना बलात्कार झाला होता असा आरोप केला होता. 5 वर्षांची असताना कुकने तीनवेळा माझे लैंगिक शोषण केले, 9 वर्षांची असताना सुरक्षारक्षकाने माझ्यासोबत गैरवर्तन केले आणि अमेरिकेत असताना 14 व्या वर्षी एका बागेमध्ये 17 वर्षाच्या मुलाने माझ्यावर बलात्कार केला होता, असा धक्कादायक खुलासा सोमी अली हिने केला होता.