श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही उभय संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर सुरू असून श्रीलंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 6 बाद 259 अशी मजल मारत 23 धावांची आघाडी घेतली. या मालिकेची इंग्लंड आणि श्रीलंकेसह हिंदुस्थानमध्येही जोरदार चर्चा सुरू आहे. याला कारणही तसेच असून हिंदुस्थानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूच्या मुलाची इंग्लंडच्या संघात निवड झाली आहे. हॅरी सिंग असे या खेळाडूचे नाव आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीसाठी 20 वर्षीय हॅरी सिंग याची इंग्लंडच्या संघात 12 वा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूक 37 व्या षटकामध्ये काही कारणाने मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून हॅरी सिंग हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. हॅरी सिंह हा हिंदुस्थानचे माजी खेळाडू रुद्र प्रताप सिंग यांचा मुलगा आहे.
2007 मध्ये हिंदुस्थानकडून टी-20 वर्ल्डकप जिंकलेल्या रुद्र प्रताप सिंग याच्याशी हॅरीचा काही संबंध नाही. तर तो 1980 च्या दशकामध्ये हिंदुस्थानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या हॅरी सिंग यांचा मुलगा आहे. त्यांनी हिंदुस्थानकडून दोन एक दिवसीय सामने खेळले. यात त्यांना फक्त एक विकेट्स घेता आली. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी आपली कसदार गोलंदाजी दाखवत 150 बळी घेतले आणि एका शतकासह 1413 धावाही चोपल्या आहेत. मात्र वडील हिंदुस्थानकडून खेळले आणि मुलगा इंग्लंडचा संघात कसा पोहोचला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
लखनऊमध्ये जन्मलेल्या रुद्र प्रताप सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण देऊ लागले. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आणि तिथे इंग्लंड क्रिकेट बोर्डामध्येही त्यांची नेमणूक झाली. लँकेशायर काउंटी संघालाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. 90च्या दशकात इंग्लंड गाठलेल्या रुद्र प्रताप सिंग यांच्या घरात 16 जून 2004 मध्ये हॅरी सिंग याचा जन्म झाला.
हॅरी सिंग याने इंग्लंडमध्येच क्रिकेटचे धडे गिरवले आणि जुलैमध्ये त्याची लँकेशायरच्या संघात निवड झाली. लँकेशायरसाठी त्याने 7 सामने खेळले. हॅरी हा एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने 7 सामन्यात 87 धावा केल्या आणि 2 विकेट्सही घेतल्या. तसेच त्याने इंग्लंडच्या अंडर-19 संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामनाही खेळला आहे. यात त्याने 67 धावांची खेळी साकारली होती.
जगज्जेतेपद त्या त्रिमूर्तींमुळेच; रोहित शर्माकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव