कॅन्सरविरोधी लढाईत मनीषा कोईरालाची मोठी मदत, सोनाली बेंद्रेचे भावोत्कट उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगातून बरी झाली. या कठीण समयी मनीषा कोईराला आपल्याला मदतगार ठरली, असे भावोत्कट उद्गार सोनालीने बंगळुरू येथे काढले. मनीषाने स्वतःही कर्करोगा विरोधात लढा दिला आहे. त्यावर तिने पुस्तकही लिहिले आहे, असेही सोनाली म्हणाली. मनीषाला 2012 साली गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. मात्र उपचार घेतल्यावर 2014च्या मध्यात ती पूर्णपणे बरी झाली.

एफआयसीसीआय एफएलओ संस्थेच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलत होती. ‘‘कर्करोग झालेला असतानाच्या काळात अभिनेत्री मनीषा कोईराला किंवा क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्याकडून काही टीप्स मिळाल्या का,’’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला, तेव्हा ती आपल्या भावना व्यक्त करताना पुढे म्हणाली की, मनीषा कोईराला हिला मी प्रत्यक्ष भेटले होते, पण युवराज सिंगला भेटले नाही. त्याच्या आईशी याबाबत मी खूप बोलले.

मदत आणि मोलाचे सल्ले…
केवळ मनीषाच नव्हे तर सिनेमा क्षेत्राशी संबंध नसलेल्या काही जणांनीही मला भरपूर मदत केली. ती मी विसरू शकणार नाही. माझे पती गोल्डी बहल हेदेखील ठामपणे माझ्या मागे उभे राहिले होते.