
कझाकिस्तान येथे झालेल्या 12 व्या आशियाई अॅक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करीत वाशी नाका परिसरात राहणाऱ्या सोनालीने हिंदुस्थानी संघाला सुवर्णपदक तर रितेशने कास्यपदक मिळवून देऊन भाऊ-बहिणीने इतिहास रचला. त्यासोबतच याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत कु. सोनाली बोराडे ही एकमेव महिला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने 5 सुवर्ण, 2 रौप्य, 7 कास्यपदके पटकावत इतिहास रचला. खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राहुल ससाणे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू आंतरराष्ट्रीय पंच योगेश पवार, राष्ट्रीय पंच सुनील रणपिसे, रमेश सकट यांनी मार्गदर्शन केले होते. स्पर्धेत महिला तिहेरीत (अक्षदा ढोकळे, रितिका महावर, सोनाली बोराडे) तीन सुवर्णपदके, पुरुष संघ (नमन महावर, प्रशांत गोरे, कुणाल कोठेकर, रितेश बोराडे) चार कास्यपदके अशी 14 पदकांची कमाई केली आहे.
























































