
कोलकाता येथे पार पडलेल्या हिंदुस्थान – बांगलादेश यांच्यामधील ‘डे-नाइट’ कसोटीला दणदणीत प्रतिसाद लाभल्यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी हिंदुस्थानने आगामी प्रत्येक मालिकांमधील एखादी कसोटी तरी डे-नाइट खेळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ यापुढे चारऐवजी तीन वर्षांचा असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सौरभ गांगुलीने याबाबत संकेत दिले आहेत. एम. एस. के प्रसाद व गगन खोडा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून जतीन परांजपे, सरणदीप सिंग व देबांग गांधी यांना पुढील वर्ष पदावर कायम ठेवण्याची शक्यता आहे.


























































