
एअर होस्टेसला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या एका प्रवाशाला व त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीला विमानातून उतरविण्यात आल्याचा प्रकार स्पाईस जेटच्या विमानात घडला आहे. या प्रकरणी त्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पाईस जेटने याबाबत एक पत्रक काढून माहिती दिली.
#WATCH | “Unruly & inappropriate” behaviour by a passenger on the Delhi-Hyderabad SpiceJet flight at Delhi airport today
The passenger and & a co-passenger were deboarded and handed over to the security team at the airport pic.twitter.com/H090cPKjWV
— ANI (@ANI) January 23, 2023
23 जानेवारीला स्पाईस जेटचे एक विमान दिल्लीवरून हैदराबादला जाण्यासाठी सज्ज झाले होते. त्याचवेळी विमानातील एका प्रवाशाने एअर होस्टेसला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप एअर होस्टेसने केला. त्यानंतर त्या प्रवाशामध्ये आणि एअर होस्टेसमध्ये बाचाबाची झाली. सदर प्रवाशासोबत असलेल्या व्यक्तीने विमानात जागा कमी असल्याने चुकून स्पर्श झाला असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र एअर होस्टेसने याबाबत सुरक्षा रक्षकांना कळवले. त्यानंतर त्या प्रवाशाला व त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या अशा दोघांनाही विमानातून उतरविण्यात आले. या सर्व प्रकारानंतर त्या प्रवाशाने लेखी माफी मागितली मात्र तरिही विमानात पुढे कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली.
Flyer accused of misbehaving with female cabin crew member on SpiceJet’s Delhi-Hyderabad flight arrested: Police
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2023
काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात एका मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने एका वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी एका विमानातील दोन प्रवाशांच्या फ्रिस्टाईल हाणामारीचा व्हिडीओही व्हायरल झालेला.
























































