एसआरए प्रकल्पात 500 चौरस फुटांचे घर द्या!

619

झोपडपट्टी पुनर्विकास धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टीधारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500चौरस फुटांपर्यंत वाढवण्यात यावे, अशी मागणी वस्त्राsद्योग, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून यासंबंधीचे निवेदन दिले. झोपडपट्टीतील नागरिकांना सध्या पुनर्विकासात देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ अपुरे पडते. पाच व्यक्तींचे कुटुंब असेल तर जागेची अडचण निर्माण होते. त्यामुळे ‘एसआरए’ योजनेनुसार पात्र झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौरस फूट केल्यास त्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या