श्रीदेवीला हयातीतच राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, बोनी कपूर यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी 

मॉम चित्रपटासाठी श्रीदेवीला मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कर मिळाला. हा पुरस्कार श्रीदेवीच्या हयातीत मिळायला हवा होता अशी खंत बोनी कपूर यांनी व्यक्त केली. पणजीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात आयोजित केलेल्या कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच कपूर घराण्याच्या तरुण पिढेला हिट देण्यासाठी दिग्दर्शात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जान्हवी कपूरही उपस्थित होती.

भविष्यात कपूर कुटुंबीयांना घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांना आणि त्यांच्या मुलांच्याही भूमिका असतील, असे बोनी कपूर म्हणाले. अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.

मुलाखती दरम्यान जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश झाले. जान्हवी कपूरने आपल्या आईवर केलेली कविता सादर करुन तिच्याप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावू आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु असे सांगितले. आईच्या मृत्यूनंतर आमचा परिवार एक झाल्याचे तिने सांगितले, तर बोनी कपूर यांचा स्वर श्रीदेवीबद्दल बोलताना जडावला. ३० वर्षात ३० चित्रपट तिने केल्याचे सांगून सुनहरा संसार आणि ज्यूली चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणून काम केल्याचे सांगितले. तिन पिढ्यांसोबत तिने काम केल्याचे बोनी कपूर यांनी आवर्जुन सांगितले. ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा, अशी खंतही व्यक्त केली.

लेखकांसाठी आवाहन

बोनी कपूर यांनी पूर्वीही लेखकांची बॉलिवूडला गरज होती, आणि आजही आहे असे सांगून लेखकांना कथासंकल्पना पाठविण्याचे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शकांशी लेखकांनी संपर्क साधावा. चांगल्या संकल्पनेवरील कथानकावर चित्रपट काढता येईल, असे आवाहन बोनी कपूर यांनी केले.