एसटी बसच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर तालुक्यातील बोरी ते कौसडी रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत एक महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिंतूर आगारातील मानव विकासची बस (एम.एच.22 बि.एल.3495) बस गुरुवारी सकाळी 7 वाजता जिंतूर हुन बोरी, कौसङी मार्गे मारवाडी या गावाकडे शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात होती. कौसडी येथून अनिल तुकाराम सांगुळे (17) हा विद्यार्थी बोरी येथे शिकवणीसाठी सायकलवर दप्तर घेऊन जात होता. या विद्यार्थ्यांस बसने जोरदार धडक दिली. यामध्ये तो जागीच मृत्यूमुखी पडला.

सकाळी ७ वाजता कौसडी रोडवरील एका धार्मिक शाळेजवळील रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या जोरदार धडकेमुळे त्या विद्यार्थ्याच्या सायकलचा चेंदामेंदा झाला होता. सदरील विद्यार्थी हा परभणी येथे एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिकत होता. घटना घडताच बसचा चालक बस जागेवरच सोडून आपल्याला जमाव मारेल या भितीने जागेवरून पळून गेला.

parbhani

दरम्यान, बोरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात बसचा चालक नितीन गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बोरी पोलीस करत आहेत.