कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला प्रारंभ; ढोलताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा ‘चालू-बंद’ असा खेळखंडोबा सुरू असतानाच कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला प्रारंभ झाला. उजळाईवाडी येथील विमानतळावर ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर-मुंबईप्रमाणे ही विमानसेवा बंद करण्यात येऊ नये अशी अपेक्षा कोल्हापूरकरांकडून व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवाई योजना सेंटर रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (उडान) या योजनेअंतर्गत अलायन्स एअरची कोल्हापूर-हैदराबाद व कोल्हापूर-बंगळुरू विमानसेवा सुरू आहे. कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो विमान कंपनीला तर कोल्हापूर-मुंबई मार्गावर टू जेट आणि घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर- मुंबई विमानसेवेला स्लॉटमुळे अडचण आहे.

असा केला विमानाने प्रवास

हैदराबादहून सकाळी 9.25च्या सुमारास विमानाचे आगमन झाले. वीस मिनिटांनंतर प्रवाशांसह कोल्हापूरहून विमान हैदराबादकडे झेपावले. हे विमान हैदराबादहून सकाळी 7.45 वा प्रस्थान करेल आणि सकाळी 9.25 वा कोल्हापूर येथे आगमन होईल तर कोल्हापूरहून सकाळी 9.45 वा प्रस्थान व तिरुपती येथे सकाळी 11.40 वा पोहोचेल. त्यानंतर तिरुपतीहून दुपारी 12 वाजता प्रस्थान आणि कोल्हापूर येथे दुपारी 1.10 वा. आगमन तर कोल्हापूरहून दुपारी 1.30 वा. प्रस्थान व हैदराबाद येथे दुपारी 2.45 वा. पोहोचेल.