राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप

284

ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने उत्तर प्रदेशच्या ज्युडो असोसिएशनने आयोजित केलेल्या ज्युनियर राष्ट्रीय ज्युडो स्पर्धा 1 ते 5 डिसेंबर रोजी लखनौ येथील के. डी. सिंग बाबू स्टेडियममध्ये पार पडल्या. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेल्या संपदा फाळके (20) हिने 78 किलो वजनी गटात हिमाचल प्रदेश, केरळ यासारख्या बलाढय़ राज्यांच्या संघांना पराभूत करून पाच राज्यांच्या खेळाडूंसोबत फेऱया पार करून अखेर हरयाणाच्या संघाकडून तिला पराभव पत्कारावा लागला. अखेर संपदाने कास्य पदकावर महाराष्ट्राची छाप उमटवली. त्याचप्रमाणे मुंबईच्या प्रथम गुरव (55 किलो), अदनान शेख (100 किलो) यांनी रौप्य पदक  व शांभवी कदम हिनेही (78 किलो वजनी गट) कास्य पदक जिंकले. हे सर्व खेळाडू मुंबईचे आहेत. संपदा व शांभवी पोद्दार ज्युडो क्लब माटुंगा येथे रवींद्र पाटील (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. याप्रसंगी स्पर्धा संचालक दीप शहा आणि आयोजक मुनावर अनझर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या