शिवशक्ती, राजमाताची सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाचगणी  शिवशक्ती महिला संघ आणि राजमाता जिजाऊ या संघांनी पाचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्थानिक महिला कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. ‘अ’ गटात रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्स क्लबने मुंबईच्या शिवशक्ती संघाला चांगलेच झुंजवले. रश्मी पाटीलने एका चढाईत तीन गुणांची कमाई केल्याने कर्नाळा संघाने सुरुवातीला सामन्यावर नियंत्रण मिळवले. नंतर साधना विश्वकर्माने एका चढाईत चार गुण मिळवल्याने सामन्यातील रंगत वाढली. 10 व्या मिनिटाला कर्नाळा संघाने लोण चढवला आणि 16-11 अशी आघाडी मिळवली, पण शिवशक्तीने गुणांचा ही आघाडी कमी केली. मध्यंतराला कर्नाळा संघाकडे 17-16 अशी आघाडी होती.