
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासुन नागपूरला सुरू होणार असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज याबाबतची अधिकृत घोषणा केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता करताना विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी आगामी पावसाळी अधिवेशन हे येत्या ४ जुलैपासून सुरू होईल अशी घोषणा केली होती. मात्र हे अधिवेशन मुंबई किंवा नागपूरला होणार असल्याचे याबाबत संभ्रम होता. पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासंदर्भात शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. मुंबईतील मनोरा आमदार निवास सध्या दुरुस्तीसाठी काढण्यात आल्याने आमदारांच्या निवासस्थानाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आगामी पावसाळी अधिवेशन येत्या ४ जुलैपासून नागपूर येथे घेण्याचे आदेश जारी केले.




























































