
दिवाळी सणाच्या काळात राज्यातील आंतरशहर प्रवासात मोठी वाढ झाल्याचे रेडबसच्या आगाऊ बस आरक्षणातून समोर आले आहे. सणासुदीच्या काळात सुमारे 5 लाख प्रवासी बसने प्रवास करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सणासुदीचा काळ लक्षात घेता 435 बस ऑपरेटर्सनी एसटी महामंडळासह कंबर कसली आहे. सध्या 10 हजार दैनंदिन फेऱया चालविल्या जात आहेत. रेडबसने जारी केलेल्या डाटानुसार पुणे ते नागपूरपर्यंतचा मार्ग सर्वाधिक मागणी असलेला आहे. रेडबसवर प्रवासासाठी सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिह्यांतून आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी
सणांमध्ये असलेली गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. मास्क वापरणे, बसमध्ये सॅनिटायझरचा वापर अनिर्वाय करण्यात आला आहे. बसमध्ये चढताना प्रवाशांचे तापमान मोजले जाते तसेच वातानुकूलित बसमध्ये प्रवाशांना चादरी पुरविल्या जात नाहीत.
अशी आहे बुकिंगची मागणी
राज्यांतर्गत प्रवास 70 टक्के
आंतरराज्य प्रवास 30 टक्के
सध्याच्या बुकिंगपैकी 76 टक्के बुकिंग ही वातानुकूलित प्रवासासाठी आहे.
रेडबसवर सर्वात कमी मागणी असलेला शेगाव आणि खामगाव या दोन शहरांमधील मार्ग असून हे अंतर 25 मिनिटांत कापले जाते.
सर्वाधिक मागणी असलेला मुंबई ते पाटणा हा मार्ग असून हे अंतर कापण्यासाठी 36 तास लागतात.


























































