गोरेगावात नाट्य़गृह आणि मंडईचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गोरेगावमधील नागरिक ज्याची अनेक वर्षे प्रतीक्षा करत होते त्या प्रभाकर पणशीकर नाटय़गृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर या भागात नाट्य़गृह आणि मंडई उभी राहत आहे.

या प्रकल्पात ८०० आसनांचे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नाटय़गृह, सुमारे २१० विक्री गाळ्य़ांसह मंडई आणि बहुमजली निवासी इमारतीत ५३ सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १२२ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मागील २५ वर्षे स्थानिक आमदार या नात्याने याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले. आपल्या दमदार अभिनयाने मराठी रंगभूमी गाजवणारे आणि दर्जेदार नाटय़निर्मिती करणारे दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने याआधीच मंजूर केला आहे. सोमवार, ३० जुलै रोजी संपन्न होणाऱया या सोहळय़ाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रिन्सिपल महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत आदी उपस्थित राहणार आहेत.