साताऱयात पावसाची जोरदार ‘बॅटिंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यात विविध ठिकाणी आज पहाटे मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. सातारा, कराड, खंडाळा, कोरेगाव व खटाव तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले.

गेल्या आठवडय़ाभरात जिह्यात उन्हाची तिरीप वाढली असून, उकाडय़ाने लोक हैराण झाले आहेत. अशावेळी आज पहाटे जिह्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. सातारा शहर व तालुक्यात तसेच खंडाळा, कराड, कोरेगाव तसेच खटाव तालुक्याच्या विविध भागांत पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. कराड तालुक्यात काही ठिकाणी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास पुन्हा तासभर दमदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला.