
इंडियन एअरफोर्समध्ये ‘किल्ला’ (फ्लॅकर) नावाने ओळखले जाणारे सुखोई SU-30MKI हे रशियन बनावटीचे फायटर जेट आहे. रशियाच्या सुखोई कंपनीने तयार केलेले हे विमान आता हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी बनवते. 2014 मध्ये एका सुखोई SU-30MKI विमानाची किंमत 368 कोटी रुपये होती.
वैशिष्ट्य –
– हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
– सुखोई SU-30MKI फायटर जेट्सचा वेग 2,500 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.
– हे एक टू सीटर आणि डबल इंजिन विमान आहे.
– विमानात विध्वंसक ब्रह्मोस क्षेपणास्त्र बसवण्यात आले असून याची मारक क्षमता नुकतीच वाढवण्यात आली आहे.
सुखोई SU-30MKI ही लढाऊ विमाने विशेष करून इंडियन एअर फोर्ससाठी बनवण्यात आली आहेत. 8 जून 2006 ला तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी हे विमान हवेत उडवले होते. वयाच्या 74 वर्षी हे विमान चालवून अब्दुल कलाम यांनी इतिहास रचला होता. लढाऊ विमान हवेत उडवणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले.
Air Force Day 2023 – ‘नभः स्पृशं दीप्तम्’! नौदलानंतर हवाई दलाला मिळाला नवा ध्वज
दरम्यान, 1997 ला पहिले सुखोई विमान इंडियन एअरफोर्समध्ये समाविष्ट करण्यात आले. आतापर्यंत वायुदलाने जवळपास 290 सुखोई विमानांचा वापर केल्याचा अंदाज आहे. राफेल विमानांचा ताफा हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत आला तेव्हा याच विमानांनी त्याला संरक्षण दिले होते. जुलै, 2020 ला हिंदुस्थानने आणखी 12 सुखोई 30MKI विमानांसाठी करार केला आहे.

























































