राष्ट्रीय कुडोत मुंबई सिटी कुडो संघाला घवघवीत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच सोलन, हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या बाराव्या राष्ट्रीय कुडो स्पर्धेत कुडो असोसिशन ऑफ मुंबई सिटी संघाच्या कुडोपटूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करीत 2 सुवर्ण पदके, 1 रौप्य पदक आणि 3 कास्य पदके अशा 6 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 1900 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेला केंद्रीय युवा वित्त आणि क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली होती. कुडो असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कुडो प्रशिक्षक संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुडोपटूंनी अफलातून कामगिरी केली. भाविका दिनेश खांडेकर (सुवर्णपदक),  प्रियांसी संजय शिंत्रे (सुवर्णपदक),  मैत्री शेखर कालुवाला  (रौप्यपदक), मैथिली हरेश हंबीरे (कास्यपदक), कार्तिक मदनसिंग राजपूत (कास्यपदक) आणि गौरव गुणाजी करंडे (कास्यपदक) या युवा कुडोपटूंनी  स्पर्धेत मुंबईसाठी पदकांची कमाई केली.