
बऱ्याचदा छातीत कफ झाल्याने प्रचंड त्रास होतो, गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो आणि फुप्फुसातील कफ बाहेर पडायला मदत होते. कोमट दुधात हळद घालून प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. तुळशीच्या पानांचा काढा कफ कमी करण्यासाठी गुणकारी असतो. गरम मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा मोकळा होतो.
लसूण कफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. कांद्याचा रस पिल्यामुळे छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते. हर्बल चहा आणि सूप यांसारखी गरम पेये कफ पातळ करण्यास मदत करतात. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील कफ पातळ होण्यास मदत होते. घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.