जावयाने गळफास घेवून आत्महत्या केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नांदेड

पत्नीला फारकत घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या सासरा व मेव्हुण्याच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंत्रीनगर येथे घडली.

विनायक किशनराव कदम रा. मंत्रीनगर, नांदेड याने आपली बोलेरो गाडी व सोन्याचे दागिने विकून सासरा व मेव्हुण्यास पैसे दिले होते. काही दिवसानंतर दिलेले पैसे विनायक कदम याने मागितले असता त्यांनी देण्यास नकार दिला. उलट सासरा व मेव्हुण्याने विनायक कदमलाच मारहाण केली. त्याचबरोबर त्याच्यापासून फारकत घेण्यासाठी पत्नीवर ते दबाव टाकीत होते. या त्रासाला कंटाळून विनायक कदम याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी किशनराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन जणांविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.