युगांडा पॅरा-बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानींचाच दबदबा; सुकांत कदमने पटकावले सुवर्णपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युगांडातील आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी दिव्यांग बॅडमिंटनपटूंचाच दबदबा दिसला. हिंदुस्थानच्या सुकांत कदमने युगांडा आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडिमटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर टोकियो पॅरा-ऑलिम्पिक विजेत्या प्रमोद भगतने तीन रौप्यपदकांची कमाई केली.

पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या सुकांत कदमने हिंदुस्थानच्याच नीलेश गायकवाडचा 38 मिनिटांत 21-16, 17-21, 21-10 असा पराभव केला. क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या भगतला मात्र अंतिम लढतीत संघर्ष करावा लागला. पुरुष एकेरीत भगतला सहकारी मनोज सरकारकडून 19-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.