मध्य प्रदेशात 2 लढाऊ विमाने कोसळली

मध्य प्रदेशातील मुरैना इथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. हवाई दलाची दोन विमाने कोसळली असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सुखोई-30 आणि मिराज 200 ही लढाऊ विमाने कोसळली आहे. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर विमानतळावरून उड्डाण केलं होतं. नियमित सरावासाठी ही विमाने अवकाशात झेपावली होती, मात्र काही कारणांमुळे ती कोसळली. या दुर्घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली आहे.

मुरैनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की ही लढाऊ विमाने पहाटे साडेपाचच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाली होती. दिलासादायक बाब ही आहे की दुर्घटनेपूर्वी दोन वैमानिकांनी स्वत:ची विमानातून सुटका करून घेतली होती. विमानातील तिसरा वैमानिक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर धाडण्यात आले होते. ही दुर्घटना कशी झाली हे शोधून काढण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या विमानांची एकमेकांसोबत टक्कर झाली होती का अन्य काही कारणामुळे ही दुर्घटना घडली ही शोधून काढण्याचे काम ही समिती करणार आहे.