कार्यालयात होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवा, सनी लिओनीचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्न स्टार सनी लिओनी ही बऱ्याचदा सामाजिक विषयांवर बोलत असते. नुकताच सनीने कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्याला हात घातला आहे. सनीने तिची एक शॉर्टफिल्म सोशल मीडियावर शेअर केली असून त्यातून तिने कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन महिलांना केले आहे.


View this post on Instagram

Workplace harassment is difficult to deal with but you don’t have to be quiet. Find yourself a supportive boss!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीने इंस्टाग्रावर तिची एक श़ॉर्टफिल्म शेअर केली आहे. त्यात सनी एका कंपनीची बॉ़स असते. त्या कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा तिचा वरिष्ठ अधिकारी विनंयभंग करत असतो. तिला कुठेही स्पर्श करणे, एकटं भेटण्यासाठी दबाव आणने असे प्रकार तिच्यासोबत सुरू असतात. अखेर ती कर्मचारी मोठ्या हिमतीने सनीला याबाबत सांगायला जाते. त्यावेळी सनी तिला धीर देत त्याविरोधात आवाज उठविण्यास सांगते. तसेच ते कशाप्रकारे करायचे याची आयडीया देखील देते. सनीच्या मदतीमुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सर्वांदेखत पोलखोल होते.