ऋतिकला ‘सुपर 30’ साठी प्रतिष्ठsचा सिने पुरस्कार

762

प्रतिष्ठत दादासाहेब फाळके पुरस्कारावर आपल्या अभिनयाची मोहोर उमटवल्यानंतर ऋतिक रोशन याला झी सिने ऍवॉर्डने ‘सुपर 30’ मधील भूमिकेसाठी गौरविले आहे. ऋतिकने केवळ दोन महिन्यांदरम्यान ‘वॉर’ आणि ‘सुपर 30’ या दोन विभिन्न विषयांच्या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. चाहत्यांनी त्याच्या या दोन्ही भूमिकांना भरभरून दाद दिली आहे. चाहत्यांच्या हृदयात आजही त्याचे स्थान अबाधित आहे, असे या पुरस्कारावरून दिसून येते. ‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये ‘सुपर 30’ नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमांतर्गत आनंद कुमार यांनी आतापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना निःशुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या