काय सांगता… सुपरमॅनच्या कॉमिक्सची तब्बल 24 कोटींना विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रांतून संपूर्ण गोष्ट उलगडण्याचे सामर्थ्य कॉमिक्समध्ये होते. त्यामुळे बच्चे कंपनीच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांना कॉमिक्स आकर्षित करायचे. सध्याच्या डिजीटल युगात कॉमिक्सची क्रेझ कमी झाली आहे. त्यामुळेच जुन्या कॉमिक्सना जणू सोन्याचे भाव आले आहेत. सुपरमॅनच्या जुन्या कॉमिक्सच्या प्रतींची रेकॉर्डब्रेक किंमतीला म्हणजेच 24 कोटी रुपयांना विक्री झाली आहे.

कॉमिक कनेक्ट डॉट कॉम या ऑनलाईन लिलाव करणाऱया कंपनीच्या माहितीनुसार, सुपरमॅन हे पात्र लोकांसमोर आणणाऱया कॉमिक्सच्या काही प्रतींची तब्बल 24 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. यापूर्वी 2014 मध्येदेखील कॉमिक्सची अशाचप्रकारे विक्रमी किंमतीला विक्री झाली होती.

कॉमिक कनेक्टचे सीओओ व्हिन्सेंट झर्झोलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉमिक्स 1938 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. तिथूनच खऱया अर्थाने सुपरमॅनची सुरुवात झाली होती. पहिल्यांदा कॉमिक्स प्रकाशित झाले, तेव्हा त्याची तुफान विक्री झाली. त्यातील आता केवळ 100 प्रतीच शिल्लक राहिल्या आहेत.