नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, जामिनाचा निर्णय उच्च न्यायालयालाच घ्यावा लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना धक्का देत त्यांच्या जामिनावर आधी मुंबई उच्च न्यायालयालात निर्णय घ्यावा लागणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालायाच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

किडनी विकाराने त्रस्त असलेल्या नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ”माझी एक किडनी खराब झाली आहे. तसंच दुसरी किडनीही कमी प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे मला जामीन देण्यात यावा असं त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटलं होतं. मात्र त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरशी संगनमत करून आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱया कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर या प्रकरणात ईडीने मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.