‘त्या’ बलात्कार पीडितेचा गर्भपात सुरक्षित आहे का? सर्वोच्च न्यायालयाकडून मेडिकल पॅनलची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्कारपीडित 14 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा 26 आठवडय़ांचा गर्भपात करणे कितपत सुरक्षित राहील? अशी विचारणा करतानाच सर्वोच्च न्यायालयाने हरयाणातील सरकारी रुग्णालयाला मेडिकल पॅनल नियुक्त करण्याचे आदेश दिले.

याबाबत लवकर अहवाल सादर करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. बलात्कारानंतर मुलगी गर्भवती राहिली. या मुलीच्या वतीने ऍड. व्ही. के. बिजू यांनी युक्तिवाद केला.