
फायबरनेट घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. काwशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी चंद्राबाबू यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला असून पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
– चंद्राबाबू नायडू यांना काwशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही आंध्र प्रदेश सरकारने फायबर नेट घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे.
























































