उन्हाळ्यात वारंवार घाम आल्याने मेकअप बिघडतो, ‘या’ मेकअप टिप्स वापरून पाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याच्या दिवसांतही बरेच जण आवडीने मेकअप करतात. काही जणांना या दिवसांत अति घाम येतो त्यामुळे केलेला मेकअप घराबाहेर उन्हात गेल्यामुळे निघून जातो. यामुळे ऑफिसला किंवा एखाद्या समारंभाला जाण्याआधीच आपला मूड बिघडू शकतो. यासाठी उन्हाळ्यात मेकअपशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर केलेला मेकअप टिकून राहू शकतो शिवाय दिवसभर टिकूनही राहू शकतो. यामुळे अत्यंत उकाड्यातही तुमचा चेहरा टवटवीत, सुंदर आणि उत्साही दिसायल मदत होईल.

सर्वप्रथम उन्हाळ्यात योग्य मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. यासाठी सकाळी ऑईल फ्री मॉइश्चरायझर लावा. यामुळे चेहरा तेलकट दिसणार नाही किंवा त्वचेवर तेल दिसणार नाही. ऑईल फ्री मॉइश्चरायझरमुळे त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे मेकअप घामामुळे ओघळत नाही.

मेकअप करण्यापूर्वी एसपीएफ 50 असलेले सनस्क्रीन लावा. ज्यावर मेकअप निट सेट होऊ शकेल.

उन्हाळ्यात पावडर ब्लशऐवजी क्रीम ब्लश, जेल ब्लश किंवा टिंट वापरा. यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल.

लिक्विड किंवा हेवी लिपस्टिकऐवजी लिप टिंटचा वापर करा. यामुळे ओठ चिकट आणि जाड दिसणार नाहीत.

उन्हाळ्यात जास्तीत जास्त वॉटरप्रुफ मेकअप करण्याचा प्रयत्न करा. काजल आणि मस्करा ही दोन सौंदर्य उत्पादने तरी वॉटर प्रुफ वापरा.

उन्हाळ्यात सेटिंग स्प्रे वापरणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे मेकअप घाम आला तरी निघून जात नाही.

ओठांवर लावलेली लिपस्टिक खराब आणि फाटलेली दिसू नये म्हणून ओठांवर लिप ऑइल किंवा लिप बाम लावल्यानंतरच लिपस्टिक लावा.