क्रूरकर्मा आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी क्रूरकर्मा आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पॉलिग्राफ चाचणी झाल्यानंतर आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जात असताना हल्ल्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

आफताबला आज पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील रोहिणी भागातील ‘एफएसएल’ कार्यालयात आणण्यात आले. चाचणीनंतर सायंकाळी पोलीस आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जाण्यासाठी निघाले असता, हातात तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी आफताबवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा  तरुणांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने बंदूक काढत हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला. तरीही तरुणांनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरूच ठेवले. अखेर चालकाने पोलीस व्हॅन पुढे नेली.

दोन मिनिटे व्हॅन बाहेर काढा, त्याला मारून टाकू

आफताब हल्ल्याचा प्रयत्न करणारा तरुण हे हिंदू सेनेचे असल्याचे सांगण्यात येते. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आफताबला दोन मिनिटे पोलीस व्हॅन बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू. तलवारीने हल्लाच काय आम्ही त्याला गोळ्याही घालू. माझे नाव कुलदीप ठाकूर असून हिंदू सेनेचा राजाध्यक्ष आहे. आम्ही दहा लोक आलो आहोत असे एका तरुणाने सांगितले.