T20 World Cup 2024 : टीम इंडियात कोण कोण असणार? इरफान पठाणने सांगितली संभाव्य खेळाडूंची नावं

जून 2024 पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात कोणाची नावं असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाणने संभाव्य खेळाडूंची नावं सांगितली आहेत.

सध्या आयपीएलमध्ये हिंदुस्थानी खेळाडू चांगले प्रदर्शन करून निवडकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. टीम इंडियाचे काही माजी खेळाडू आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसत आहेत. अशातच स्टार स्पोर्ट्सवर इरफान पठाणने संभाव्य 15 खेळाडूंची नावं सांगितली आहेत.

नारायणचा नकार; टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.