
सामना ऑनलाईन । मुंबई
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. कवी कुमार आझाद असं या अभिनेत्याचं नाव असून ते हंसराज हाथी ही व्यक्तिरेखा साकारत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी तारक मेहताच्या निर्मात्यांनी एक मीटिंग ठरवली होती. या मीटिंगमध्ये संपूर्ण मालिकेचा चमू सहभागी होणार होता. पण, आझाद यांनी तब्येत बरी नसल्याचं कळवलं होतं. सोमवारी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
























































