ट्रेंड – नॉन स्टॉप भरारी

अनेक पक्षी आपण कल्पनाही करू शकत नाही, एवढे अंतर पार करतात. त्यातलाच एक पक्षी म्हणजे अपापांग ससाणा. एका ससाण्याला जिओ टॅग लावून त्याच्या प्रवासावर सॅटेलाईटद्वारे नजर ठेवण्यात आली. या ससाण्याने न थांबता समुद्रावरून 100 किंवा 200 नव्हे तर तब्बल 6 हजार किलोमीटर अंतर पार केले. या ससाण्याचे वजन जेमतेम 150 ग्रॅम असते. मात्र, त्याने हा प्रवास पूर्ण करून सर्वांना थक्क केले. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करून माहिती दिली. अपापांग नावाच्या ससाण्याने मणिपूरमधून भरारी घेतली. तो 6 दिवसांनी अरबी समुद्र पार करून थेट केनियामध्ये दाखल झाला. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या थक्क करणाऱया प्रवासाबाबत सोशल मीडियावर नेटकरी व्यक्त होत आहेत.