आशा स्वयंसेविकांचे तहसीलदारांना निवेदन

680

मानधन नको तर वेतन हवे तसेच विविध प्रलंबित मागण्यांसह तालुक्यातील आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक 3 सप्टेंबरपासून संपावर आहेत. त्या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आशा संघटनेचे पदाधिकारी यांनी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्याकडे शुक्रवारी निवेदन दिले.

आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक या ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते तुटपुंज्या मानधनावर दिवसरात्र काम करत आहेत. आशा स्वयंसेविका यांना किमान 10 हजार रुपये वेतन, आशा गटप्रवर्तक यांना 18 हजार रुपये वेतन देण्यात यावे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाप्रमाणे सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी निफाड पंचायत समितीच्या प्रांगणात धरणे आंदोलन सुरू केले आहे. तरी सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या