
संदल मिरवणुकीच्या वेळी श्री त्र्यंबकेश्वराला धूप दाखविण्याची शंभर वर्षांची चांगली परंपरा आहे, यामुळे धार्मिक सलोखा राखला जातो, असे मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. उलट याबाबत राज्यभर गैरसमज पसरवून मोर्चे काढून, अश्लाघ्य भाषा वापरणाऱया ‘त्या’ दहा-बारा संघटनांवर कारवाई करा, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांचे नाव न घेता दलवाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे येऊन मंदिराच्या प्रवेशद्वारावरूनच त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दलवाई म्हणाले. देशभर, राज्यभर गैरसमज पसरवून वातावरण बिघडविले जात आहे. मोर्चे काढून, अश्लाघ्य भाषा वापरून सामाजिक-धार्मिक सलोखा बिघडविणाऱया दहा-बारा संघटनांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, त्यांना फंड कुठून मिळतो याची चौकशी करावी. त्र्यंबकेश्वरमधील मुस्लिम व सर्वधर्मीयांनी एवढे सर्व होऊनही शांतता राखली, याबद्दल त्यांचे काwतुक, अभिनंदन करण्यासाठी मी इथे आलो आहे. सामाजिक सलोखा बिघडवून ज्यांना दंगली घडवायच्या आहेत, त्यांना देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आदी प्रश्नांचे महत्त्व नाही. त्यांच्या मागे जनताही नाही, असे टीकास्त्र्ाही त्यांनी सत्ताधाऱयांवर सोडले.
आखाडा परिषदेकडून समिती
या प्रकरणात आता त्र्यंबकेश्वरमधील आखाडा परिषदेनेही लक्ष घातले आहे. त्यातील सत्य शोधून उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या महिनाअखेरपर्यंत समितीचा अहवाल येईल. तो शासन आणि प्रशासनाला पाठविण्यात येईल, असे आखाडा परिषदेने जाहीर केले आहे.

































































