अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकने चाहते झाले घायाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी महिलेच्या बांध्याला साजेसा पोशाख कुठला? असा प्रश्न विचारला तर एक उत्तर हमखास येईलच, ते म्हणजे साडी. कोणताही बांधा, रंग, उंची, ठेवण यांना साडी हा पेहराव अत्यंत साजेसा आहे. त्याला सामान्य महिलाच काय पण अभिनेत्रीही अपवाद नाहीत. सध्या एका अभिनेत्रीचं फोटो शूट चांगलंच गाजत आहे, तेही तिने परिधान केलेल्या साडीमुळेच.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून बाहुबलीफेम तमन्ना भाटिया आहे. तमन्नाने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमधले तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तमन्नाच्या या फोटोशूटमध्ये तिने साडी परिधान केली आहे. चकाकत्या, शिफॉन आणि फॅशनेबल ढंगाच्या साड्यांसोबत तिने ब्लाऊज म्हणून जॅकेट, ब्लेझर आणि हूडी वापरलं आहे. साडी परिधान करण्याच्या पद्धतीतही तिने काहीसा बदल केला आहे.

तिने मेकअपही अतिशय सुंदर केला असून न्यूड लूक ठेवत डोळे हायलाईट केले आहेत. साड्यांच्या रंगांच्या संपूर्ण विरुद्ध डोळ्यांना निळसर काळ्या रंगाचा स्मोकी लूक देण्यात आला आहे. या पेहरावात ती अतिशय सुंदर दिसत आहे.