
तामिळ फुटीरवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा प्रमुख प्रभाकरन हा 2009 साली श्रीलंकेच्य़ा सैन्याच्या कारवाईत मारला गेल्याचे समोर आले होते. मात्र आता प्रभाकरन हा जिवंत असून तो लवकरच सर्वांसमोर येईल असा दावा वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिल्स या संघटनेचे पी नेदुमारन यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मैं LTTE प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन के बारे में कुछ सच बताना चाहूंगा। वह जीवित हैं और स्वस्थ हैं। हमें विश्वास है कि इससे उनके लिए उत्पन्न हो रहे अफवाहों पर विराम लगेगा: पाझा नेदुमारन pic.twitter.com/U7kJGohwgx
— ANI_HindiNews (@AHindinews) February 13, 2023
सोमवारी नेदुमारन यांनी तामिळनाडू तंजावुरजवळ विलारमध्ये मुलिवैकल मेमोरियल यार्डमध्ये पत्रकारपरिषद हा धक्कादायक दावा केला. ”मी प्रभाकरन यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच हे सत्य सर्वांसमोर आणत आहे. लिट्टे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन हे जिवंत असून ते जिथे आहेत तिथे सुखरुप आहेत. माझ्या या माहितीनंतर मला विश्वास आहे की त्यांच्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम मिळेल”, असे नेदुरामन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रभाकरन लवकरच सर्वांसमोर येईल अशी शक्य़ताही वर्तवली.



























































