मस्त बातमी, तानसा धरण तुडुंब भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे सलग पडणाऱ्या पावसामुळे भरायला लागली आहे. तुळशी, मोडकसागर, विहार तलावही ओव्हरफ्लो झाल्यानंतर आता तानसा तलावही तुडुंब भरल्याचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ४ धरणे ओव्हरफ्लो झाली असून उरलेले तीन धरणे भरली की मुंबईकरांचं वर्षभराचं पाणीसंकट दूर होईल. मंगळवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा तलावही ओसंडून वाहायला लागल्याची खूशखबर मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिली आहे.