
अभिनेत्री तापसी पन्नू बिनधास्त बोलसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या चित्रपटांशी संबंधित माहिती ती सोशल मीडियावर वरचेवर शेअर करत असते. तापसीने आज इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आगामी चित्रपटाचे अपडेट दिले. ‘वो लडकी है कहाँ’चे शूटिंग पूर्ण झाल्याचे तिने सांगितले. हा सिनेमा म्हणजे एक ‘थेरीप्युटीक’ अनुभव आहे. हा सिनेमा माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगू शकत नाही, शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकवा देणारे सिनेमा केल्यानंतर ‘वो लडकी है कहाँ’ या टीमसोबत तुम्हाला हसवण्यासाठी मी खूप उत्साहित आहे, असे तापसीने म्हटलेय.
या कॉमेडी ड्रामा सिनेमात तापसी पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसेल. एसीपी कोमल शर्मा असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अलीकडेच तिने ‘वो लडकी है कहाँ’चा फर्स्ट लुक शेअर केला होता. त्यामध्ये ती प्रतीक गांधीसोबत दिसत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या सिनेमाची घोषणा झाली होती. गेल्या महिन्यात जयपूर येथे या सिनेमाचे शूटिंग सुरू होते. रॉय कपूर यांची निर्मिती असून सिद्धार्थ अर्शद सैयद यांचे दिग्दर्शन आहे.



























































