अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

शनिवारी पहाटे बेलापूर जवळ दोन कंटेनरमध्ये अपघात झाला.त्यामुळं आज पहाटेपासूनच सायन – पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावरच पडून असल्याने पनवेलकडून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावर वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कंटेनर रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. बराच वेळी वाहतूक कोंडीत सापडल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहन धारकांचे हाल होत आहेत. कंटेनर रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या