सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई प्रवास शक्य, बाजारात नवी कार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा मोटर्सने (Tata Motors) हिंदुस्थानच्या बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. उत्सवांचा माहोल लक्षात घेत टाटा ने टिगोरचं इलेक्ट्रिक व्हर्जन (Tata Tigor EV) बाजारात आणण्यात आलं आहे. टाटा टिगोरचं इलेक्ट्रिक व्हर्जनची (Tata Tigor EV) सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर इलेक्ट्रिक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. टिगोर ईव्ही जिपट्रॉन टेक्नोलॉजीवर आधारित आहे. याआधी TATA NEXON इलेक्ट्रिक कार जिपट्रॉन टेक्नोलॉजीवर आधारित आहे. आता टाटाच्या दोन इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध आहेत.

लिथियम-आयर्न बॅटरी एक मॅग्नेट एसी मोटरसोबत जोडलेली असते. ज्यामुळे कारला सतत करंट मिळतो. त्याचा बॅटरी पॅकही डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ असतो.

टाटा टिगोर इलेक्ट्रिक (Tata Tigor Electric) कार एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 306 किमी अंतर कापते. ही कारची ARAI-certified रेंज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रिक कार केवळ 5.7 सेकंदात 0.60kmph चा वेग घेते. म्हणजे तुम्ही सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास करू शकतात.

टाटाची ही कार फास्ट चार्जरच्या मदतीने 1 तासात 80 टक्के चार्ज होते. तर रेग्युलर चार्जरने 80 टक्के चार्ज होण्यासाठी साडे आठ तास लागतात.