मायावतींच्या भावाचा 400 कोटींचा बेनामी प्लॉट जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayawati

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

आयकर विभागाने बसपा अध्यक्षा मायावती यांचा भाऊ आणि बसपा उपाध्यक्ष आनंद कुमार यांचा बेनामी प्लॉट जप्त केला. दिल्लीजवळ नोएडा परिसरात असलेल्या या जागेची किंमत जवळपास 400 कोटी रुपये आहे.

आनंद कुमार आणि त्यांची पत्नी किचित्रलता या दोघांचा हा बेनामी प्लॉट जप्त करण्याचे आदेश 16 जुलै रोजी देण्यात आले. यादरम्यान चौकशी करताना त्यांच्याकडे असणार्‍या बेनामी प्लॉटची माहिती आयकर विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेला प्लॉट सात एकरांचा आहे. आनंद कुमार यांच्या अन्य संपत्तीवर लवकरच टाच येणार असून ‘ईडी’कडून यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

सात वर्षांत संपत्तीत 18 हजार पटीनी वाढ

बसपा उपाध्यक्ष असणार्‍या आनंद कुमार यांच्या संपत्तीत 2007 ते 2014 या सात वर्षांच्या कालाकधीत तब्बल 18 हजार पटीनी काढ झाली आहे. 2007 मध्ये त्यांच्याकडे 7.1 कोटींची संपत्ती होती. 2014 मध्ये ती थेट 1,300 कोटींकर जाऊन पोहचली. याबाबत चौकशी सुरू आहे.